पार्श्वभूमी

मुलाखतींमधून उपस्थित पाहुण्यांना आणि त्यांच्या कलाकृतींना जाणून घेण्याची संकल्पना खरं पाहायला गेलं तर जुनीच ! पण काळानुरुप मुलाखतींना एक साचेबद्धपणा येत गेला. तेच ते प्रश्न, ठरलेली उत्तरं या चौकटीत मुलाखती बंदिस्त होऊ लागल्या आणि त्यामुळे त्यामध्ये नाविन्यता उरली नाही. काळ बदलला, डिजिटल उत्क्रांती झाली आणि मुलाखतींची जागा पॉडकास्ट आणि राऊंड टेबल गप्पांनी घेतली. काळ बदलला, प्रश्न उत्तरांचे स्वरूप बदलले पण त्यातील साचेबद्धपणा तसाच कायम राहिला. आजच्या क्लिकबिट प्रश्न आणि त्यांच्या व्हायरल होतील अशा ‘Reel’stic उत्तरांच्या जमान्यात आम्ही काही नवे व धाडसी प्रयोग करायचं ठरवलं आणि ‘The Kcraft’ चा जन्म झाला.

संकल्पना

The Kcraft च्या माध्यमातून मुलाखतींना गप्पांचे स्वरूप देत नवे आणि अनोखे विषय निवडत कलाकारांना बोलतं करण्याचा आम्ही गेला काही काळ यशस्वी प्रयत्न करत आहोत. गेल्या २ वर्षात जवळपास २०० हून अधिक कलाकार या कट्ट्यावर केवळ हजेरी लावून गेले असं नाही तर सर्वच जण मनापासून व्यक्त ही झाले. यामध्ये ज्येष्ठ कलाकार उषा नाडकर्णी, अशोक पत्की, दिलीप प्रभावळकर  यांच्यासह स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, क्षितिष दाते, अमेय वाघ यासारख्या अनेक तरुण कलाकारांनीही आमच्या या गप्पांच्या कट्ट्यावर धमाल उडवून दिली होती.  
मनोरंजन क्षेत्रातील PR (पब्लिक रिलेशन) जगतात प्रमोशनच्या पलीकडे जाऊन गप्पांचे जे विषय कधीच कोणी हाताळले नव्हते असे विषय घेऊन आम्ही कलाकारांना बोलते केले याचा आम्हाला जास्त आनंद आहे. क्लासिक्स, न्यू अरायव्हल, टॉक ऑफ द टाऊन, ओपन माईक, माय ओपन बुक स्टोरी, स्पेशल्स, पॉवर कपल अशा नव्या नव्या संकल्पना घेऊन आम्ही चित्रीकरण सुरु केले आणि बघता बघता जवळपास १ कोटी प्रेक्षकांची पसंती मिळवत आम्ही आमची वाटचाल अशीच यशस्वीपणे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

भविष्यतील वाटचाल
भविष्यातील कार्यक्रमांसाठी प्रायोजक म्हणून आम्ही अनेक क्षेत्रीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डकडे आशेने पाहतो आहे. आपण आमच्या या कुटुंबात प्रायोजक म्हणून सहभागी झाल्यास परस्पर सहकार्यातून कला क्षेत्रात काही वेगळे आणि सृजनात्मक प्रयोग करणे शक्य होऊ शकेल असा आम्हाला विश्वास वाटतो. यासंबंधी अधिक माहितीसाठी अमोघ पोंक्षे यांच्याशी +९१ ९४२१०१०९७१ या क्रमांकावर संपर्क करा किंवा amogh.ponkshe@gmail.com वर मेल करून आमच्याशी connect करा.